रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2019 (10:49 IST)

बायोपिकमध्ये सिध्दार्थ-कियारा

कारगील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर लवकरच आपल्याला बायोपिक बघायला मिळणार आहे. या बायोपिकची आज सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या घोषणेसोबतच चित्रपटातील मुख्य कलाकारही जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका निभावतील. कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका निभावण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचे सिध्दार्थने म्हटले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या या बायोपिकचे दिग्दर्शन विष्णुवर्धन करणार आहेत. तर चित्रपटाची  निर्मिती करण जोहर, हिरू जोहर, अपूर्व मेहता, शाबीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशू गांधी हे करत आहेत. या सर्व माहितीचे एक पोस्टर आज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचा उल्लेखही पोस्टरवर आहे.