मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (11:14 IST)

कोरिओग्राफर शिवशंकर यांचे कोरोनामुळे निधन झाले

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शिवशंकर यांचे रविवारी कोविड-19 ची लागण लागल्यामुळे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. रुग्णालयातील सूत्रांनी ही माहिती दिली.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिवशंकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते कोरोना संसर्गाने बाधित होते. शिवशंकर यांच्या मोठ्या मुलावरही उपचार सुरू असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
शिवशंकर यांनी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले. चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शिवशंकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.