रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (17:23 IST)

सलमान खानने फॅनचा मोबाइल हिसकावला, तक्रार दाखल

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान विरुद्ध मुंबई मधील डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये एका फॅनने लिखित तक्रार दाखल केली आहे. तक्रार मध्ये त्या माणसाने सलमान खानवर आरोप केला आहे की त्याने गाडीतून त्याचा फोन हिसकावून घेतला. 
 
या प्रकरणात सलमानच्या बॉडीगार्डने देखील पोलिसांना क्रॉस ऍप्लिकेशन दिली आहे, ज्यात सलमानच्या परवानगीशिवाय त्याचा पाठलाग करायचा आणि व्हिडिओ काढण्याचा आरोप आहे. 
 
प्रत्यक्षात सलमान खान जुहू पासून कांदिवली येथे सायकलवर जात होता. उघड्या रस्त्यावर सलमानला सायकल चालवताना पाहिल्यावर तो माणूस सलमानचा व्हिडिओ काढू लागला. तो सुमारे 20 मिनिटांपर्यंत सलमानचा व्हिडिओ बनवत राहिला. त्याच वेळी सलमान चिडला. तक्रारीत आरोप केला आहे की सलमानने मोबाईल हिसकावून घेतला, मोबाइल नंतर बॉडीगार्ड्सने परत केला.
 
हे सर्व झाल्यानंतर हा फॅन तिथून निघून तर गेला पण त्याने त्वरित डीएन नगर पोलीस ठाण्यात सलमान खानबद्दल तक्रार नोंदविली. यात लिहिले गेले आहे की सलमान खान एक सेलिब्रिटी असून एखाद्याच्या कारमध्ये हात टाकून त्याचा मोबाइल हिसकावू शकत नाही. तक्रारीत सलमानवर योग्य कारवाईची मागणी केली आहे.