शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (15:47 IST)

'दे दे प्यार दे' सिनेमाची मोठी कमाई

अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू आणि रकूल प्रीत यांचा चित्रपट 'दे दे प्यार दे' बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारताना दिसत आहे. 
 
चित्रपटाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट अजयच्या विवाहबाह्य संबंधांभोवती फिरताना दिसत आहे. 18 वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून लांब असलेला 50 वर्षीय श्रीमंत व्यक्ती (अजय देवगण) एका 24 वर्षीय (रकूल प्रीत) मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांच्या नात्यावर आधारलेला हा चित्रपट सध्या चाहत्यांचे मन जिंकत आहे. 
 
ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श यांनी टिवटरच्या ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला. चित्रपटाने शुक्रवारी 10.41 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला होता. तर दुसर्‍या दिवशी चित्रपटाने 13.39 कोटी रूपयांची मजल मारली होती. चित्रपटाने दोन दिवसांत 23.40 कोटींची कमाई केली. दे दे प्यार दे या चित्रपटाचे दिग्दर्शन आकिब अली यांनी केले आहे. चित्रपटाची कथा लव रंजन यांनी लिहिली आहे. अजय 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या व्यतिरिक्त 'तानाजीः द अनसंगवॉरियर', 'तुर्रम खान', 'भुजः द प्राइड ऑफ इंडिया'या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.