शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (09:26 IST)

‘बंदिशाळा’ २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

bandishala maratha cinema
राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील नवा चित्रपट घेऊन येत आहेत. सौ. स्वाती संजय पाटील निर्मित व संजय कृष्णाजी पाटील आणि श्री माऊली मोशन्स पिक्चर्स प्रस्तुत व मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’ या सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली आहे. हा चित्रपट येत्या २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने कान्ससाठी निवड झाली असून ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. ‘बंदिशाळा’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत मुक्ता बर्वेची अत्यंत धाडसी भूमिका असून तिची ही भूमिका आहे.