सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (14:53 IST)

Deepika Kakar: दीपिका कक्कर एका गोंडस मुलाची आई झाली

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या घरी आनंदाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दीपिका कक्करच्या पतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. टीव्ही स्टार शोएब इब्राहिमने सांगितले की, त्यांच्या घरी मुलगा झाला आहे. या अभिनेत्याने सांगितले की, 21 जून रोजी सकाळी त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. जरी ती प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होती. घाबरण्यासारखे काहीही नसले तरी सर्व काही ठीक आहे. या गुड न्यूजनंतर अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
 
शोएबने पोस्ट शेअर करत सांगितले की, डॉक्टरांनी दीपिकाला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याची तारीख दिली होती. दीपिकाने तिच्या व्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली होती. आता दीपिकाने प्रीमॅच्युअर डिलीव्हरीतून मुलाला जन्म दिले आहे. 
 
जानेवारीमध्ये दीपिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने अभिनय न करण्याबद्दलही सांगितले. दीपिकाने सांगितले होते की, ती काही काळ आपल्या मुलाची काळजी घेईल.







Edited by - Priya Dixit