शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हॉटेलहून शैम्पूच्या बाटल्या चोरत होती दीपिका पादुकोण, फ्रेंडने उघडले रहस्य

दीपिका पादुकोणने 2007 मध्ये 'ओम शांति ओम' या चित्रपटाहून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. आपल्या अॅक्टिंग आणि स्टाइलसाठी सर्वांची आवडती दीपिका बॉलीवूडच्या A लिस्टर्स अॅक्ट्रेसमध्ये सामील आहे.
 
दीपिकाची फॅन फॉलोइंग देखील भरपूर आहे. त्यांच्या बाबतीत चाहत्यांना खूप काही जाणून घेण्याची इच्छा असते. अलीकडेच दीपिकाची बेस्ट फ्रेंड स्नेहा रामचंदरने फ्रैंडशिप डे पूर्वी तिच्यासाठी एक नोट शेअर केलं आहे, ज्यात दीपिकाचा वेगळेच अंदाज देतं. 
 
स्नेहाने दीपिकाच्या वेबसाइटवर एक स्पेशल नोट शेअर करत लिहिले की ‘दीपिका पादुकोण त्या लोकांपैकी आहे जिच्यासोबत तासोंतास गप्पा मारता येऊ शकतात. तिच्या डोळ्यात नेहमी प्रेम दिसतं. ज्याने तिला आपली किती काळजी वाटते हे जाणवतं. ती माझ्यासाठी हॉटेल्सच्या खोलीतून शैम्पूच्या लहान-लहान बाटल्या चोरून आणायची.
 
ती जेव्हा कधी फिरायला जायची तेव्हा ती असं करायची कारण मला त्या आवडतात हे तिला चांगलंच ठाऊक होतं. दीपिकासाठी माझं प्रेम अतूट आहे. तुझ्या सारखी मैत्रीण असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते.
 
प्रत्येक महिन्याला तिचा जवळीक तिच्याबद्दल काही नवीन माहीत पुरवत असतं. यापूर्वी इम्तियाज अलीने देखील दीपिकासाठी पोस्ट लिहिली होती.
 
दीपिका पादुकोण लवकरच मेघना गुलजारच्या 'छपाक' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत विक्रांत मैसी दिसणार. हा सिनेमा अॅसिड अटॅक सर्वाइव्हर लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या व्यतिरिक्त दीपिका रणवीर सिंहसोबत ’83’ या चित्रपटात त्याच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार. हा सिनेमा कपिल देवच्या जीवनावर आधारित आहे.