फ्री असूनही ‘दिल बेचारा’ टोरंट साइट्सवर लिक झाला  
					
										
                                       
                  
                  				  अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २४ जुलै (शुक्रवारी) रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला आहे. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार लीक झालेला चित्रपट हा HD क्वालिटीचा आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आला.
				  													
						
																							
									  
	 
	या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. त्याचप्रमाणे मुकेश छाबडाने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाला सर्वाधिक IMDb रेटिंग मिळाली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट पाहून असंख्य चाहते भावूक झाले. प्रदर्शनानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर ट्रेण्ड होऊ लागला. चित्रपटातील सुशांतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.