बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑक्टोबर 2018 (08:30 IST)

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा आगळा-वेगळा विक्रम

शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’या चित्रपटाने एक आगळा-वेगळा विक्रम रचला आहे. या चित्रपटाने मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर चित्रपटगृहात तब्बल १,२०० आठवडे पूर्ण केले आहेत. मागच्या २३ वर्षांपासून मराठा मंदिरमध्ये या चित्रपटाचा नियमित शो सुरु आहे. 
 
या चित्रपटासाठी चाहत्यांकडून जे भरभरुन प्रेम मिळाले त्याबद्दल शाहरुखने टि्वटरवरुन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. २३ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आजही असाच सुरु आहे. राज-सिमरनवर तुम्ही जे इतके वर्ष प्रेम करताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असे शाहरुखने टि्वटमध्ये म्हटले आहे. काजोलनेही टि्वट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.