गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (12:53 IST)

'नो एन्ट्री'च्या सिक्वलमध्ये अर्जुन

बॉलिवूडमधून अनेक मोठ्या चित्रपटांच्या घोषणा होताना गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. अशात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 2015 मध्ये आलेल्या 'नो एन्ट्री' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. पण या सिक्वलध्ये सलमानऐवजी अर्जुन कपूर झळकणार आहे. या चित्रपटाच्या तयारीला चित्रपटाचे निर्माता बोनी कपूरने सुरुवात केली आहे. पण हा चित्रपट साकारण्याआधी अर्जुनने निर्मात्यांसमोर एक अट ठेवली आहे. या चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा आहे, पण ते सलमानच्या परवानगीनंतरच अशी ती अट आहे. याबद्दल आधी आपण सलमानसोबत बोलणार आणि नंतरच हा चित्रपट साकारणार आहे, असे अर्जुनने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. आता सलमान यावर काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.