प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या
अभिनेत्री मलायका अरोराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी टेरिसवरून खाली उडी मारत आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी नऊ वाजता घडली असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल अरोरा यांनी बांद्रा यामध्ये असलेलेली इमारत आशा मैनार च्या सातव्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. सांगितले जाते आहे की अनिल अरोरा मागील काही महिन्यांपासून आजारी होते.
याघटनेनंतर मलायकाचे एक्स हसबंड अरबाज खान देखील त्यांच्या घरी पोहचले. पोलिसांना प्राथमिक माहितीमध्ये कोणतीही आत्महत्या नोट्स मिळाली नाही. तसेच अनिल अरोरा यांच्या मृतदेहाला पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मलायका यांना जेव्हा सूचना मिळाली तेव्हा त्या पुण्यामध्ये होत्या. त्या तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. अनिल अरोरा हे भारतीय मर्चट नेवी मध्ये नोकरी करायचे.