रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (17:46 IST)

उल्हासनगर येथे ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने ऑटोचालकाला मुलीची छेड काढताना अडवले, ऑटोचालकाने मारहाण केली

beat
उल्हासनगर येथे एका ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका ऑटोचालकाला मुलीची छेड करताना रोखल्यावर ऑटो चालकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सदर घटना छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ कर्तव्य बजावताना मद्यधुंद अवस्थेत एका ऑटोचालकाने पुलावर ऑटोपार्क करून एका मुलीची छेड काढत होता. वाहतूक पोलिस मोहन पाटील यांनी घटनास्थळ गाठून ऑटोचालकाला पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला असता तो पसार झाला. नंतर तो छत्रपती शाहू महाराज ओव्हरब्रीजवर पोहोचून रिक्षाची मागणी करू लागला. 

दरम्यान ऑटोचालक आणि पोलीस कर्मचारीमध्ये वाद झाला आणि हाणामारी सुरु झाली. त्याने पोलिसांवर पाणी फेकले, मारहाण केली, कानशिलात लगावली या मारहाणीत पोलीस कर्मचारी जखमी झाला. मोहन पाटील म्हणाले, आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना काही गुंड प्रवुत्तीचे लोक आमच्यावर हल्ला करतात. पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 
Edited by - Priya Dixit