शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:38 IST)

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन

मुंबई : बॉलिवूडच्या आणखी एका स्टारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाचे वडील संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. 18 सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. हिमेशच्या वडिलांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
तसेच हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया हे 87 वर्षांचे होते ते इतर अनेक आजारांनी त्रस्त होते. हिमेशच्या वडिलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. व नंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. रेशमिया कुटुंबाच्या जवळच्या मैत्रिणी वनिता थापर यांनी या दु:खद बातमीला दुजोरा दिला. 
 
विपिन रेशमिया हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार होते आणि त्यांनी आरडी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि शंकर जयकिशन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते. याशिवाय त्यांनी 1987 मध्ये इन्साफ की जंग या चित्रपटाची निर्मिती केली होती.

Edited By- Dhanashri Naik