1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (17:18 IST)

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

sanjay raut
शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात कट रचण्याचा आरोप करत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. 
 
बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा  यांच्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या विरोधात कट रचला जात असून त्यांच्या जीवाला धोका आहे.

काही जण त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचार करत आहे. बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या गप्प राहण्याचा निषेध करतो. तुमच्या पक्षातील काही जण हल्ला करण्याचे बोलतात त्यावर तुम्ही गप्प का आहात.

नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सांगितले होते की, देशातील प्रत्येकाला समान संधी मिळू लागल्यावरच काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. ते म्हणाले होते, "सध्या भारतात अशी परिस्थिती नाही." या वरून संजय गायकवाड यांनी राहुल गांधीं बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. आज लोकशाही असून देखील राहुल गांधी आणि माझ्यासारख्या विरोधी पक्षनेत्यांना जीवाचा धोका असल्याचे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit