मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (11:52 IST)

लवकरच विवाहबद्ध होणार फरहान-शिबानी दांडेकर?

या वर्षात विवाहबंधनात अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे दोघेही अडकणार असल्याच्या चर्चा आता बी टाऊनमध्ये रंगू लागल्या आहेत. ही जोडी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिबानी आणि फरहान एकेकांमसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात, या दोघांच्या नात्याची चर्चा तेव्हापासून सुरू आहे. ते दोघेही नुकतेच एका रिसेप्शन पार्टीतही एकत्र दिसल्यामुळे या दोघांच्या नात्यांवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले. आता या नात्याला फरहानच्या मुलांनीदेखील हिरवा कंदील दिला असल्याचे समजत आहे. शिबानी नुकतीच फरहानची मुले आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसली. या नात्याबद्दल फरहान आणि शिबानी खूपच गंभीर आहेत. तसेच फरहानच्या मुलांनादेखील शिबानीची सोबत आवडली असल्यामुळे ते दोघेही नक्कीच   पुढचा विचार करतील, असेही त्यांच्या जवळची व्यक्ती एका मुलाखतीत म्हणाली. त्यामुळे 2019 मध्ये ते दोघेही विवाहबंधनात अडकतील अशा चर्चा आहेत.