गौतमी पाटीलच्या आईचा व्हिडीओ व्हायरल प्रथमच लेकीसोबत दिसली
लावणी क्वीन गौतमी पाटील कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. तिच्या चाहतांचा वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. काही दिवसांपूर्वी गौतमीने आपल्या आईसोबत एक फोटो शेअर केला होता.ती लहान असतानाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ मध्ये गौतमीचा एक चाहता म्हणत आहे '' उंबराच्या झाडाला दत्तगुरूंची सावली.. गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली'' असे म्हटल्यावर गौतमी पुढे येते आणि आईला घट्ट मिठी मारते. हे दृश्य मायलेकीतील घट्ट नात्याला दर्शवणारे आहे. या व्हिडीओ मुळे गौतमीच्या चात्यांना गौतमीची आई बघता आली. गौतमीच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. गौतमीच्या कुटुंबाबदद्ल जाणून घ्यायची चाहत्यांची उत्सुकता आहे.
गौतमी ही मुळात धुळ्याची आहे. ती स्वतःला खान्देशाची मुलगी म्हणते. तिचा जन्म सिंधखेडा गावात झाला तिथेच ती लहानाची मोठी झाली. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. तिच्या वडिलांनी तिचा जन्म झाल्यावर तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. गौतमीचा सांभाळ तिच्या आईच्या वडिलांनी केला .नंतर त्या पुण्यात राहण्यासाठी गेल्या.काही दिवसांपूर्वी तिचे वडील रवींद्र पाटील हे माध्यमांसमोर आले. तेव्हा त्यांनी तिला आपले म्हणावं असं वाटलं.तेव्हा तिच्या वडिलांची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आता तिच्या आईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या निमित्ताने तिच्या आईची झलक चाहत्यांना पाहता आली.
Edited by - Priya Dixit