1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (18:19 IST)

Gautami Patil : गौतमी पाटील विरोधात बार्शी पोलिसात तक्रार

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते.आता ती पुन्हा अडचणीत आली आहे. बार्शी पोलिसात तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या आयोजकांनी तिच्यावर फसवणूक करण्याच्या गुन्हा दाखल केला आहे. 
 
तिच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमीने कार्यक्रमाला उशिरा येऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. राजेंद्र गायकवाड यांच्यावर या पूर्वीच परवानगी न घेता गौतमीचा कार्यक्रम करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

12 मे रोजी बार्शी येथे गौतमी लावणी महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्या कार्यक्रमात गौतमी उशिरा आल्याने गौतमी पाटील, गौतमीचा सेक्रटरी विनोद आणि केतन मारणे यांनी मिळून आयोजकांची फसवणूक केल्याचा आरोप करत बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
 

Edited By -Priya Dixit