1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (11:30 IST)

Hansika Motwani Wedding अभिनेत्री हंसिका अडकणार लग्नबंधनात

Hansika Motwani Wedding: जवळपास एक दशकापासून इंडस्ट्रीत काम करणारी सुंदर अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हंसिका मोटवानी यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिकाच्या लग्नासाठी खास जागा बुक करण्यात आली असून हे बॉलिवूडचे पुढचे भव्य लग्न असू शकते.
 
वृत्तानुसार कोई मिल गया या चित्रपटातून लोकप्रिय झालेली हंसिका लग्न करणार आहे. बातम्यांनुसार, हंसिका राजस्थानमधील प्रसिद्ध 450 जुना किल्ला आणि पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. लग्नाची तयारी सुरू झाली आहे, लग्नासाठी हा किल्ला बुक झाला आहे.
 
 सध्या हंसिकाने याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. हंसिकाचे हे लग्न अगदी शाही पद्धतीने होणार असल्याची चर्चा आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या या पॅलेसचे नाव मुंडोटा फोर्ट आणि पॅलेस आहे. हे जयपूरच्या लक्झरी ठिकाणांपैकी एक आहे.
Edited by : Smita Joshi