शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 जुलै 2020 (13:20 IST)

Happy Birthday : कियारा आडवाणी

आज ३१ जुलै रोजी कियाराचा वाढदिवस (Happy birthday kiara advani) आहे. कियाराने गेल्या वर्षी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. पण यंदा करोनामुळे (#coronavirus) उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्या मित्र-मैत्रीणींसोबत कियारा वाढदिवस साजरा करणार असल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग पहिल्या क्रमांकावर आहेत.

बॉलिवूडची बेबो करिना कपूर (Karina Kapoor), सोनम कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागड्या बॅग वापरताना दिसतात. या यादीमध्ये कियारा आडवाणीचा देखील समावेश झाला आहे.

गेल्या वर्षी कियाराने वाढदिवस (Happy birthday kiara advani) साजरा करताना पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने सॅटिन फायब्रिकचा फिश कट प्लेन स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला होता. त्यावर तिने छोटी बॅग घेतली होती. पण ही छोटी बॅग सर्वांचे आकर्षण ठरली होती.