बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (14:17 IST)

‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चे पोस्टर सोशल मिडीयावर

hasina the queen
अभिनेत्री श्रद्धा कपूरने  आगामी ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटातील तिचा लूक सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर चित्रपट  आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़.  ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ मध्ये श्रद्धाचा भाऊ सिद्धांत हादेखील आहे. तो यात दाऊद इब्राहिमची भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या १४ जुलैला प्रदर्शित होईल.