सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (13:07 IST)

प्रेग्नेंसी दरम्यान हेमा मालिनी शूट करत होत्या हा सुपरहिट चित्रपट

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी लवकरच आपल्या मुलगी ईशा देओलसोबत 'इंडियन आयडॉल 13' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. शोमध्ये हेमा मालिनी त्यांच्या 'सत्ते पे सत्ता' या हिट चित्रपटाबद्दल बोलताना दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या हृदयाच्या खूप जवळ का आहे, याचा खुलासा त्यांनी केला.
 
शोची स्पर्धक अनुष्का पात्रा मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या गेटअपमध्ये 'सत्ते पे सत्ता' मधील 'प्यार हमने किस मोड पे ले आया' या गाण्यावर परफॉर्म करताना दिसणार आहे. यानंतर हेमा मालिनी सांगते की हा चित्रपट सर्वांना खूप आवडला. शूटिंग करतानाही मी खूप एन्जॉय केले.
 
यानंतर हेमा मालिनी यांनी खुलासा केला की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या प्रेग्नंट होत्या. त्या म्हणाल्या की 'सत्ते पे सत्ता' चित्रपटाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्या वेळी ईशा होणार होती. या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये होत होते आणि तेव्हा श्रीनगर खूप सुंदर होते, ओबेरॉय हॉटेलच्या जवळ एक फार्महाऊस होते जिथे आम्ही थांबलो होतो. गुलमर्ग आणि पहलगाममध्येही आम्ही शूटिंग केलं. मी सांगू इच्छिते की काश्मीर हे नंदनवन आहे आणि काश्मीरचे लोक खूप प्रेमळ आहेत.
 
1982 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटात हेमा मालिनीसोबत अमिताभ बच्चन, सचिन पिळगावकर, अमजद खान, शक्ती कपूर, कंवलजीत सिंह यांसारखे कलाकार दिसले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.