1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Hrithik Roshan sexiest men of Asia

'हृतिक' आशियातील सर्वात सेक्सी पुरुष

हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळाली आहेत. 
 
हा मान मिळवल्यानंतर हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. ‘सर्वप्रथम मला मत दिलेल्यांचे मनापासून आभार. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरुन परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवले आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हे मी पाहतो’ असे हृतिक म्हणाला आहे. 
पुढील लेख
‘इंडियन आयडॉल’ मध्ये आता गायक हिमेश रेशमिया