बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

बीबीसीच्या आशियाई सर्व्हिसवर बघा क्रिकेट विश्व चषक 2019 चे विशेष कव्हरेज

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ब्रिटन आणि जगभरातील चाहत्यांसाठी बंगला, हिंदी, उर्दू, तमिळ, मराठी, सिंहली आणि पश्‍तून भाषेत क्रिकेट विश्व चषक एका नवीन दृष्टीकोनातून कव्हरेज करत आहे. इंग्लंड आणि वेल्सहून वर्ल्ड चषकाच्या पूर्ण टूर्नामेंट दरम्यान बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे बहुभाषी पत्रकार न्यूज व्यूज शेअर करतील. याचा फायदा भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील लाखो चाहत्यांनी मिळू शकेल.
 
बीबीसी न्यूज भारतीय भाषेचे प्रतिनिधी विनायक गायकवाड, शिवकुमार उलगनाथन आणि नितिन श्रीवास्तव विश्व चषकातील आकर्षक कहाण्या सांगतील.
 
भारताचे सर्व सामने कव्हर केले जातील आणि ब्रिटनच्या ज्या शहरांमध्ये सामने होत आहे तेथील चाहत्यांशी बातचीत करून जिंकण्याच्या अपेक्षांवर चर्चा केली जाईल.
सामना दरम्यान बीबीसी हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तमिळ आणि तेलुगूच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एफबी लाइव्ह, भविष्यवाणी, मॅच विश्लेषण आणि विशेष स्टोरीसह इतर सामुग्री उपलब्ध असेल.