रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (10:53 IST)

‘इंडियन आयडॉल’ मध्ये आता गायक हिमेश रेशमिया

#MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर संगीतकार-गायक अनु मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकपदावरून हटविण्मायात आले. अनु मलिकऐवजी आता या कार्यक्रमात गायक हिमेश रेशमिया परीक्षकपदी विराजमान होणार आहे.
 
२०१८ मध्ये #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यात गायिका सोना मोहपात्राने त्याच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. या दोन गायिकांनीही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर सोनी वाहिनीने त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून काढून टाकले होते.