मुन्नाभाई एम बी बी एस च्या दिग्दर्शकाचा आगामी चित्रपट क्रिकेटवर आधारीत
मुन्ना भाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्ना भाई व ३ इडियट्स यासारखे सुपरहीट चित्रपट देणारे निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा आगामी चित्रपट क्रिकेटवर आधारीत असू शकतो. त्यांच्याकडे क्रिकेटवर आधारीत दोन चित्रपटांचे प्रस्ताव आले असून त्यापैकी एक प्रख्यात क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा बायोपिक आहे.
बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक, निर्माता व लेखक म्हणून राजकुमार हिरानींचे वेगळे स्थान आहे. हिरानी यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. क्रिकेटवर आधारीत दोन चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांच्याकडे दोन प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी एक फॉक्स सिनेमाचा प्रोजेक्ट असून पीयूष गुप्ता व नीरज सिंह लिखित लाला अमरनाथ यांचा बायोपिक आहे. सध्या राजकुमार हिरानी हे वेब मालिका तसेच अन्य स्क्रीप्टवर काम करत आहेत.