सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मिताली राजचा शाबाश मिथू, मितालीची भूमिका तापसी पन्नू करणार

महिला क्रिकेटपटू आणि भारतीय संघाची कर्णधार मिताली राजला तिच्या ३७ व्या वाढदिवशी तिच्या क्रिकेट कारकिर्दीवर चरित्रपट म्हणजेच बायोपिक करणार असल्याची गुड-न्यूज मितालीला देण्यात आली. शाबाश मिथू असे या बायोपिकचे नाव असणार आहे. या चरित्रपटात मितालीची प्रमुख भूमिका तापसी पन्नू करणार आहे. 
 
बॉलिवूडची ‘मिताली राज’ म्हणजेच तापसीने आज मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तापसीने केवळ मितालीचे अभिनंदनच केले नाही, तर तिच्यासोबत तिचा वाढदिवसदेखील साजरा केला. तापसीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. महत्त्वाचे म्हणजे त्यातच तापसीने मितालीच्या बायोपिकची घोषणादेखील केली. अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिच्यासोबत वाढदिवस साजरा केल्याचे फोटो शेअर केले.