शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (11:55 IST)

त्या सीननंतर मला 'तसे' रोल ऑफर झाले

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेला बदलापूर चित्रपटादरम्यान व्हायरल झालेल्या न्यूड सीन नंतर सेक्स कॉमेडीच्या अनेक ऑफर येऊ लागल्या आहेत. राधिका अश्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत. नुकतीच राधिकाने बरखा दत्तच्या वुमन या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी राधिकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी ती आपल्या फिल्मी करिअरबद्दल भरभरून बोलली आणि आपल्या आयुष्याबद्दल अनेक खुलासेही केले. यावेळी बदलापूर चित्रपटादरम्यान व्हायरल झालेल्या न्यूड सीनबद्दल विचारले असता राधिका म्हणाली, माझा न्यूड सीन व्हायरल झाल्यानंतर अनेकांना वाटले मी त्याच प्रकारच्या भूमिका करते. या चित्रपटानंतर मला अनेक सेक्स कॉमेडीच्या ऑफर येऊ लागल्या.
पुढे राधिका म्हणाली, तुम्ही ऐकून हैराण व्हाल की जेव्हा मी बदलापूर हा चित्रपट करत होते त्यावेळी एकजण माझ्यावर बलात्कार करून मारण्यास इच्छित होता. या सीननंतर सेक्स कॉमेडी फिल्मच्या ऑफर येऊ लागल्या. याला कारणीभूत माझी अहिल्या ही शॉर्ट फिल्म ठरली. ज्या शॉर्ट फिल्ममध्ये मी न्यूड सीन दिले होते.
 
यानंतर मला केवळ असाच प्रकारच्या भूमिकर ऑफर झाल्या. मी कधीही प्रेक्षकांना विचारलं तुम्ही माझ्या भूमिकर बघितल्या आहेत का तर केवळ बदलापूर आणि अहिल्याचं नाव प्रेक्षक घेतात. लवकरच राधिका दिग्दर्शकाच्या भुमिकेतून आपल्यासोर येणार आहे. स्लीपवॉकर्स असे या शॉर्ट फिल्मचं  नाव आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.