शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'काबिल' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार

Hrithik Roshan
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा 'काबिल' चित्रपट चीनमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हृतिक चित्रपटाच्या प्रीमियरसाठी बीजिंगमध्ये दाखल झाला आहे. चीनमध्ये विमानतळावरच 
 
हृतिकचं त्यांच्या चीनी चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. 
 
चीनमधील हृतिकच्या चाहत्यांनी त्याला 'दा शुआई' असं नाव दिलं आहे. 'दा शुआई' म्हणजे अतिशय सुंदर. हृतिक विमानतळावर दाखल होताच त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.  ५ जून रोजी 'काबिल' चीनमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.