1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (11:08 IST)

'हंगामा -२'चे नवे पोस्टर रिलीज

hungama-2-shilpa-shetty-and-paresh-rawal-are-ready-for-a-laugh
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आगामी 'हंगामा -२' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे. तर सध्या या चित्रपटाचे नवे पोस्टर निर्माते तरण आदर्श यांनी रिलीज केले आहे.   
 
'हंगामा -२'च्या पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकार एकत्र एका हॉटेलच्या टेबलवर बसलेले दिसत आहेत. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत परेश रावल, मिजान जाफरी आणि प्रणिता सुभाष यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हंगामा -२' यावर्षी १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 
 
शिल्पा शेट्टी लवकरच 'हंगामा २' आणि 'निकम्मा' या बॉलिवूड चित्रपटांतून कमबॅक करत आहे. 'निकम्मा' या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यु दासानी आणि शर्ली सेतिया यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत.