शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे निधन, अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला
भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे निधन झाले. जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते.
पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचे निधन झाल्यावर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनी जसराज यांना लहानाचं मोठं केलं.
पंडित जसराज यांनी संगीताच्या दुनियेत आपले 80 वर्ष दिले असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय स्वरांचे त्यांचे प्रदर्शन एल्बम आणि फिल्म साउंडट्रॅक रूपात तयार केले गेले आहेत. जसराज यांनी भारत, कॅनडा आणि अमेरिकेत संगीताचे शिक्षण दिले आहे.
IAU ने 11 नोव्हेंबर 2006 साली शोधण्यात आलेल्या हीन ग्रह 2006 VP32 (संख्या -300128) ला पंडित जसराज यांच्या सन्मानात 'पंडितजसराज' नाव दिले होते.
पंडित जसराज यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.