1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Jackie Chan and Bachchan in the sequel of the aakhe

आँखेच्या सिक्वलमध्ये जॅकी चॅन आणि बच्चन

२००२मध्ये आलेला आँखे हा एक थरारपट होता. निवृत्त बँकर असलेले विजय सिंग राजपूत आपल्या एका अपमानाचा बदला घेण्यासाठी तीन अंधांना बँक दरोड्याचं प्रशिक्षण देतात. त्यासाठी ते अपहरण, खून असे अनेक गुन्हेही पचवतात आणि त्या तीन अंधांकरवी दरोडा घडवूनही आणतात. पण, तो डाव त्यांच्यावरच उलटतो, अशी त्या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटात विजय सिंग राजपूत या मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन होते, तर त्यांच्यासोबत सुश्मिता सेन, अक्षय कुमार, अर्जुन रामपाल आणि परेश रावल यांच्याही भूमिका होत्या.
 
आता आँखेच्या सिक्वलमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि विकी कौशल मुख्य भूमिकांमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. तसंच यावेळी बँकेऐवजी कॅसिनो दाखवण्यात येणार असून त्याच्या मालकाच्या भूमिकेत जॅकी चॅन दिसू शकतात. या चित्रपटाचं चित्रीकरण २०१९ मध्ये सुरू होणार असून २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी करणार आहेत.
पुढील लेख
जेव्हा सनी देओलने आपल्या वडिलांकडून मार खाल्ला