बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जून 2018 (15:26 IST)

अतिउत्साहात चाहत्याने केले ‘काला’चे थेट फेसबुकवर लाईव्ह

Live Kaala
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’प्रदर्शित झाला. यावेळी एका चाहत्याच्या अतिउत्साहात फर्स्ट डे फर्स्ट शो थेट फेसबुकवर लाईव्ह केला. अखेर लाईव्ह करणाऱ्या त्या युवकाला पोलिसांनी शोधून काढलं आणि अटक करण्यात आली. दक्षिणेतील अभिनेता विशाल यानं यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तसंच हे लाईव्ह देखील फेसबुकवरून हटवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
‘काला’चित्रपटगृहात झळकताच शिट्या, आवाज, प्रार्थना सुरू झाल्या. अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं. पण सिंगापूरमधील एकानं तर हद्दच केली. त्यानं सरळ फेसबुक लाईव्ह केलं. अनेकांना चित्रपट फेसबूकवर लाईव्ह पाहायला मिळाला. पण दुसरीकडे चित्रपट वितरक आणि पोलिसांची पळापळ सुरू झाली.