1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (18:35 IST)

कंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं

Kangana Ranaut is not relieved
अभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.आता कंगना पुन्हा अडचणीत सापडली आहे त्यामुळे तिने कोर्टात धाव घेतली असून तिला हाती निराशा मिळाली आहे.कोर्टाने देखील तिची बाजू न घेता तिला फटकार लावली आहे.
 
प्रकरण अस आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंगना आणि तिची बहिण रंगोलीवर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एका बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टर आणि  फिटनेस ट्रेनरने  धार्मिक तेढ निर्माण करणं तसेच जाणीवपूर्वक धार्मिक भावनां दुखवण्याचा आरोपां अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तिला तिच्या पासपोर्ट रिन्युवल करण्यासाठी बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने कंगना चे पासपोर्ट रिन्यू करण्यास नकार दिला आहे.
 
त्यामुळे तिला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशात जायचे आहे. मात्र तिच्या पासपोर्टची वैधता केवळ 15 सप्टेंबर पर्यंत असल्याने तिला पासपोर्ट तातडीने रिन्यू करायचे आहे.या साठी तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.पण तिलाच कोर्टाने पासपोर्टची मुदत संपताना एन वेळी याचिका का दाखल केली अस म्हणून चांगलेच फटकारले असून या प्रकरणात कोणताही दिलासा मिळाला नाही.या प्रकरणात पुढील सुनावणी 25 जून रोजी होणार आहे.     
 
याचिकेत कंगनाने नमूद केले आहे की मला चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशी हंगेरीला जायचे आहे मात्र माझ्यावर लावण्यात आलेल्या देशद्रोहाच्या आरोपामुळे माझे पासपोर्ट रिन्यू करण्यास पासपोर्टातील अधिकारी नकार देत आहे.मला माझ्या पासपोर्टचे नूतनीकरून करून मिळावे. 
 
मला चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडता येणार नाही त्यामुळे मला तातडीने परस्पोर्ट रिन्यू करून मिळावे अशी विनंती करत आहे.मात्र या प्रकरणात तिला हायकोर्टातून कोणता ही दिलासा मिळाला नाही.