गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (07:31 IST)

कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' . कपिल शर्माचे विनोद, त्याचे सेन्स ऑफ ह्युमर यावर प्रेक्षक खळखळून हसतात. अगदी बाहेरच्या देशातूनही लोक हा शो बघायला येतात. कोणताही सिनेमा असो त्याचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो मध्ये झालेच पाहिजे असा हट्ट असतो. पण आता कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय.
 
टेलिप्रॉम्पटरवर पाहून वाचतो जोक्स
कपिल शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय.तो जेव्हा बोलतो, विनोद करतो तेव्हा ते खूपच नॅचरल वाटते. पण आता एका युझरने असा दावा केला आहे की कपिल शर्मा टेलिप्रॉम्पटरवर बघून जोक्स वाचतो. क्लोक ऑफ इनव्हिजिबिलिटी clokofinvisivili.t या इन्स्टाग्राम हॅंडल वरुन एका युझरने व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात टेलिप्रॉम्पटरचे रिफ्लेक्शन कपिलच्या मागे असलेल्या काचेच्या खिडकीवर दिसून येते.
 
या व्हिडिओवर तुफान कमेंट्स सुरु झाल्या आहेत. काही जणांनी कपिलला ट्रोल केले आहे तर काही युझर्स त्याला पाठिंबाही देत आहेत. ही एक आवश्यक प्रक्रिया आहे, लाईव्ह परफॉर्मन्स करताना चूक होऊ नये म्हणून खबरदारीसाठी याचा वापर होतो अशी कमेंट एकाने केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor