सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (10:55 IST)

सोशल मीडियानेच मला अभिनेता बनवले : कार्तिक

सध्या अनेकांवर अभिनेता कार्तिक आर्यन भूरळ घालत आहे. त्याला केवळ चाहतेच नव्हे तर अभिनेत्रीही डेट करण्याची इच्छा बोलूनदाखवत आहेत. 
 
अशात या अभिनेत्याने नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या  'चॅट शो'मध्ये हजेरी लावली. त्याने यावेळी आपला सिनेसृष्टीतील प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर केला. यावेळी त्याने मला अभिनेता सोशल मीडियानेच बनवल्याचे म्हटले. माझी चित्रपटसृष्टीत कोणाशीही ओळख नसल्याने मी ऑडिशन देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचे त्याने म्हटले. सतत फेसबुक आणि गुगलवर मी ऑडिशनसाठी सर्च करत असे. 
 
अनेकदा ऑडिशनही दिल्या आणि खूप वेळा अपयशी ठरलो, असेही तो म्हणाला. आपल्या आई-वडिलांचाही या गोष्टीला विरोध असल्याचे त्याने सांगितले. पण कार्तिकने या सर्व अडचणी पार करत आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले. तो आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत असून तो लवकरच 'लुका छुपी' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.