सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (11:31 IST)

एंड काउंटर : गुन्हेगारी विश्वाचा एक वेगळा पैलू मांडणारा चित्रपट

ए.जे. एन्टरटेनमेंट प्रस्तुत आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित एंड काऊंटर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अंडरवर्ल्ड, गॅंगवॉर आणि एन्काऊंटर यांवर आधारित अनेक चित्रपट आपण याआधी पाहिलेत. अंडरवर्ल्ड आणि सिनेमा ह्यांचे अतूट संबंध आहेत. ते नातं नेमकं काय आहे, त्याची एक वेगळी आणि हळवी बाजू ह्या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. जतीन उपाध्यय निर्मित ह्या चित्रपटात प्रशांत नारायणन आणि मृण्मयी कोलवालकर हे मुख्य भूमिकेत आहेत.
गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणा-या ह्या चित्रपटात प्रशांत नारायणन एन्काऊंटर स्पेशालिस्ट समीर देशमुखच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर (रेणू) त्याची प्रेयसी आणि कादंबरीकाराच्या भूमिकेत दिसत आहे. मृण्मयी कोलवालकर ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. ह्या चित्रपटात समीर आणि रेणूची एक सुंदर अशी प्रेमकथा दाखवली आहे. पण त्यादरम्यान समीरच्या हातून एक एन्काऊंटर होते, ज्यामुळे संपुर्ण चित्र बदलून जाते. ह्यात पोलिस आणि गँगस्टरमधील एक मैत्रीचं घट्ट नातं देखील दाखवलं आहे, ज्याचा ट्विस्ट सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलाय. ह्यात प्रशांत नारायणन आणि मृण्मयीची एक सुंदर अशी प्रेमकहानी दाखवलीय ज्यात तणावही तितकाच आहे. त्यामुळे ह्या प्रेमाचा शेवट गोड होती की वाईट हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. तसेच ह्या चित्रपटात कॉमेडी स्टार एहसान कुरेशी आणि व्रिजेश हिरजी च्या विनोदाने सिनेमात एक वेगळीच रंगत आणलीय. त्याच्या विनोदामुळे क्लायमेक्स नंतर चित्रपटात थोडा जीव आणला आहे.
 
हा सिनेमा नाशिकच्या एका एन्काऊंटर स्पेशालिस्टच्या कथेवर आधारित आहे. दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव ने एन्काऊंटरच्या विषयावर एका अनोख्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट हा केवळ एन्काऊंटरवच आधारित आहे, अशातला भाग नाही, तर प्रेम, पार्टनरशिप, लिव्ह इन रिलेशनशिप ह्या विषयांवरही आधारित आहे. गोल्ड कॉईन एन्टरटेनमेंटच्या साहाय्याने ए. जे. डिजिटलच्या ह्या सिनेमात भरपूर ऍक्शन ड्रामा ही आहे. ह्या चित्रपटाचे खूपच उत्कृष्ट आहेत जे बहुतकरुन नाशिकचे आहेत.
मराठीमोळी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकरने कुल्फी कुमार बाजेवाला मालिकेत काम केले असून दिग्दर्शक अलोक श्रीवास्तवच्या एका मराठी चित्रपट मिस मॅचमध्ये काम केले आहे. तिच्या कामावर प्रभावित होऊन अलोक श्रीवास्तवजींनी तिची ह्या चित्रपटासाठी निवड केली.चित्रपटातील गाणी ही देखील तितकीच सुंदर आणि चित्रपटाला साजेशी अशी आहे. त्यातील रोमँटिक गाणं “मैं तो जी रहा तेरे प्यार में” हे समीर आणि रेणूच्या प्रेमाला चार चांद लावणारे आहे. त्यातील इतर गाणी ही तितकीच हल्की-फुल्की आहेत. एकूणच ह्या चित्रपटाला आम्ही देतो ३ स्टार.