1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (11:14 IST)

आलियाने कंगनाची माफी मागितली !

Aalia
मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झाशी या चित्रपटाला बॉलिवूडकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री कंगना राणावतने त्यावरुन सिनेसृष्टीवर निशाणा साधला आहे. सर्वजण मणिकर्णिका चित्रपटाबाबत इतके गप्प का? असा सवाल कंगनाने बॉलिवूडकरांना विचारला आहे. कलाकार या सिनेमाला पाठिंबा का देत नाहीत? असा प्रश्र्न उपस्थित करताना, कंगनाने अभिनेत्री आलिया भट्ट आणि आमिर खानचे नाव घेत त्यांच्यावरही हल्ला चढवला. त्यानंतर आता कंगनाच्या नाराजीवर आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे. आलिया म्हणाली, जर कंगना माझ्यावर नाराज असेल तर मी वैयक्तिकरीत्या तिची माफी   मागेन. मला वाटत नाही की, कंगना माझ्यावर नाराज असेल. मी तिला जाणूनबुजून नाराज केले, असंही नाही. जर मी असे केले असेल तर मी तिची माफी मागेन. मला कंगना नेहमीच आवडते.