बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

झीरोच्या अपशयाने शाहरूख सतर्क

बॉलिवूड किंग शाहरूख खानचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट झीरो हा फार काही काळ बॉक्स ऑफिसवर तग धरू शकला नाही. त्यामुळे आता शाहरूख आपल्या चित्रपटाचे सिलेक्शन खूप विचारपूर्वक करतो. शाहरूख गेल्या काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर खास काल करू शकलेला नाही. त्याचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट झीरोदेखील चालला नाही. त्याचबरोबर क्रिटिक्सनेदेखील या चित्रपटाकडे पाठ फिरवली. त्यामुळे शाहरूख आता आपल्या चित्रपटांची निवड खूप विचारपूर्वक करू लागला आहे. 
 
शाहरूख हा पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर बनणार्‍या सारे जहां से अच्छा या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा बर्‍याच काळापासून बॉलिवूडमध्ये रंगली होती. परंतु त्या नंतर त्याने या चित्रपटातून अंग काढून घेतले. त्यामुळेच की काय, शाहरूखला झीरोच्या अपयशाने चांगलेच सतर्क केले असल्याचे वाटू लागले आहे. 

तूर्तास त्याच्या आगामी चित्रपटाचीअधिकृत घोषणा होणे बाकी आहे, परंतु यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना 
शाहरूखने आपल्या भीतीविषयी उलगडा केला. शाहरूख म्हणाला, मला त्या दिवसाची भीती वाटते, जेव्हा मी देखील रोल्सविषयी रिस्क घेण्याचे टाळू लागेन व बोरिंग चित्रपटांमध्ये जुन्या व्यक्तिरेखा साकारण्यास सुरुवात करेन. मला सकाळी अशाप्रकारे उठायचे नाहीयं, ज्यावेळी मी प्रयोग करून थकलेलो असेन व 40 दिवसांमध्ये संपणार्‍या चित्रपटांमध्ये अडकून पडेन. शाहरूखने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने दिग्दर्शक व वेगवेगळ्या कथांबरोबरही प्रयोग केले आहेत. एकीकडे त्याने फॅनमध्ये डार्क व इंटेंस डबल रोल केला होता, तर झीरोमध्ये त्याने एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती, परंतु तरीही हे चित्रपट कमाईच्या बाबतीत मागेच राहिले.