बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (09:55 IST)

प्रिया वारियर पुन्हा एकदा चर्चेत !

डोळा मारण्याच्या व्हिडीओमुळे रातोरात हिट झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. “ओरु अडार’ या तिच्या आगामी सिनेमातील “फ्रिक पिल्ला’ या गाण्याचे तेलगू व्हर्जन आता नुकतेच रिलीज झाले आहे. त्यातील काही हॉट सीनची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रिया आणि रोशन अब्दुल राउफ या हिरोमध्ये हे हॉट सीन आहेत. अजून सिनेमा रिलीजही झालेला नाही. पण “फ्रिक पिल्ला’ या गाण्याने युट्युबवर धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे.
 
4 फेब्रुवारीला हा व्हिडीओ अपलोड झाला आणि 7 फेब्रुवारीपर्यंत त्याला 8 लाख व्ह्यूज आणि 17 हजार लाईक मिळाले होते. मूळ मल्याळम गाण्यातील गीतावरून थोडीफार टीकाही झाली होती. काही डिसलाईकही मिळाले होते. मात्र तेलगू व्हर्जन प्रेक्षकांना खूप आवडले आहे. तेलगूमध्ये “ओरु अडार’ हा सिनेमा “लव्हर्स डे’ नावाने रिलीज होणार आहे. या गाण्याबाबत एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे या गाण्याला संगीत दिले आहे ऑस्कर विनर ए. आर. रेहमानने.