सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (10:16 IST)

साराला मिळाला बिग बजेट चित्रपट

सारा अली खान या नवोदित अभिनेत्रीचे एकापाठोपाठ असे दोन चित्रपट रीलिज झाले. यामध्ये प्रथम 'केदारनाथ' व त्यानंतर 'सिम्बा'. 'केदारनाथ'मधील साराच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले तर 'सिम्बा'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा झेंडा फडकला. याच साराच्या हाती आता आणखी एक मोठा चित्रपट लागला आहे. उपलब्ध माहितीनुसार करण जोहर यांच्या 'धर्मा प्रोडक्शन हाऊस'ने सारा अली खानला एका बायोपिकमधील महत्त्वाची भूमिका देऊ केली आहे. हा चित्रपट कन्नन अय्यर हे दिग्दर्शित करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'एक थी डायन' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. मात्र, हा चित्रपट फार काळ चालू शकला नाही. या अपयशानंतर अय्यर हे पुन्हा दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. उल्लेखनीय म्हणजे सारा अली खानच्या 'सिम्बा' या चित्रपटाला करण जोहर यांचे बॅनर धर्मा प्रोडक्शनने सपोर्ट केले होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा अली खानची जान्हवी कपूरशी तुलना केली जात आहे. मात्र, बिग बजेट चित्रपट हाती लागल्याने साराची आता थेट टक्कर जान्हवी कपूरशी असल्याचे म्हटले जात आहे. कारण जान्हवीनेही एक बायोपिक साईन केला आहे.