1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (13:01 IST)

'83'मध्ये संदीप पाटील यांची भूमिका साकारणार त्यांचाच मुलगा

Sandeep Patil's  son role in '83'
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 1983साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित '83' हा चित्रपट येणार आहे. पुन्हा एकदा पडद्यावर त्यावेळी नेमके काय झाले होते हे पाहायला ळिणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचे संदीप पाटील हे देखील एक भाग होते. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांचाच मुलगा चिराग पाटील याच्या वाट्याला आली आहे. चिराग 36 वर्षांनंतर आपल्या वडिलांचीच भूमिका या चित्रपटात साकारणार आहे. आतापर्यंत 11 मराठी चित्रपट आणि काही हिंदी चित्रपटात चिरागने भूमिका साकारल्या आहेत. माझ्याच वडिलांची भूमिका '83' चित्रपटात साकारायला मिळणार असल्यामुळे प्रचंड उत्सुक असल्याचे त्याने एका माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीज विरोधातील सामन्यात संदीप पाटील यांनी दमदार फलंदाजी केली होती.