शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

केदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याधिकाऱ्यांना राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुवस्था राखण्यासाठी या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या चित्रपटावर आहे.
 
चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निर्मात्यांनी परवानगी मागितली होती तेव्हा आम्हाला त्यांनी  कथा ऐकवली नव्हती. मात्र केदारनाथ हे हिंदू धर्मियांसाठी पवित्र स्थान आहे जर या चित्रपटात आक्षेपार्ह दृश्य असतील किंवा यातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मात्र निर्मात्यांना मोठा दंड भरावा लागेल असंही पर्यटन मंत्री सतपाल महाराज म्हणाले.