बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

इंदिरा यांच्यासाठी गायले नाही म्हणून किशोरच्या गाण्यांवर घातली गेली बंदी

आणीबाणी दरम्यान (1975-77), प्रसिद्ध गायक किशोर कुमारचे गाणे दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर पूर्णपणे बॅन करण्यात आले होते.
 
कारण, संजय गांधींनी किशोर कुमार यांना इंदिरा गांधींच्या 20-प्वाइंट प्रोग्रामवर आधारित काँग्रेसच्या रॅलीत गायले म्हटले होते, परंतू किशोर यांनी स्पष्ट नकार दिला होता. यानंतर तात्काळीन माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी किशोर कुमार यांना इंदिरा गांधींसाठी गायला सांगितले होते तरी किशोर यांनी नाकारले.
 
यामुळे विद्याचरण शुक्ल यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर त्यांच्या गाण्यांवर अनधिकृत रूपात प्रतिबंधित केले होत. इमरजेंसी संपल्यावर आणि काँग्रेस पराभूत झाल्यावर हा बॅन हटला. या प्रकारे सुमारे तीन वर्षापर्यंत किशोर कुमारच्या गाण्यांवर बंदी होते.