शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (12:29 IST)

लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह, ICU मध्ये दाखल

भारताची कोकिळा म्हणून प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ज्येष्ठ गायिकेवर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (ICU) उपचार सुरू आहेत.  त्या 92 वर्षांच्या आहेत. 
 
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार लता मंगेशकर कोविड पॉझिटिव्ह आल्या होत्या, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली होती. त्याची भाची रचना हिने एएनआय या वृत्तसंस्थेला याची पुष्टी केली आहे.