गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 एप्रिल 2021 (15:22 IST)

अमेझॉन ऑरिजिनल "लोल - हँसे तो फसे"चा ट्रेलर प्रदर्शित; सीरीज़ 30 एप्रिलला होणार रिलीज !

अमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या अमेझॉन ऑरिजिनल नवी सीरीज़ "लोल - हँसे तो फसे"चा अधिकृत ट्रेलर प्रकाशित केला आहे. अंतरराष्ट्रीय अमेझॉन ओरिजिनल सिरीज 'लोल'च्या या प्रादेशिक एडिशनमध्ये कॉमेडियन्सची एक अख्खी फळी, ज्यांनी भारतात विनोदाच्या मंचावर आपला अमीट ठसा उमटवला, दिसणार आहे आणि त्याचे यजमान असणार आहेत अरशद वारसी आणि बोमन ईरानी.
 
या विनोदाच्या फळीतले हरहुन्नरी कलाकार असणार आहेत, आदार मलिक, आकाश गुप्ता, अदिति मित्तल, अंकिता श्रीवास्तव, साइरस ब्रोचा, गौरव गेरा, कुशा कपिला, मल्लिका दुआ, सुनील ग्रोवर आणि सुरेश मेनन यामध्ये कडव्या आव्हानांना सामोरे जाताना दिसणार आहेत.
 
कदाचित पहिल्यांदाच या मंचावर केवळ विनोदाचीच परीक्षा होणार नसून, आपल्या संयमाची देखील कसोटी लागणार आहे. "लोल - हँसे तो फसे" साठी सज्ज व्हा जो 30 एप्रिलला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर लिंक: https://youtu.be/RqwFkL1ojtk