सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (15:15 IST)

माधुरी दीक्षितने खरेदी केला नवा फ्लॅट; भरली एवढी स्टॅम्प ड्युटी

madhuri dixit
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी ‘मजा मा’ या अॅमेझॉन प्राइमच्या व्हिडिओमुळे खूप चर्चेत आहे. ‘मजा मा’ रिलीज जवळ आला असून त्याचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. दरम्यान, माधुरी दीक्षितने मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केल्याची बातमी आहे. माधुरीचा हा फ्लॅट लोअर परेल भागात असून तो ५३ व्या मजल्यावर आहे.
 
असा आहे फ्लॅट
माधुरी दीक्षितने मुंबईच्या लोअर परेल भागात एक नवीन फ्लॅट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत ४८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियाबुल्स ब्लू प्रकल्पातील हा फ्लॅट आहे. या फ्लॅटची नोंदणी २८ सप्टेंबर रोजी झाली आहे. माधुरीचा हा फ्लॅट ५३व्या मजल्यावर आहे. ५३८४ स्क्वेअर फूटाचा हा फ्लॅट असून माधुरीला एकूण ७ कार पार्किंग मिळाल्या आहेत. या अपार्टमेंटचा विक्रेता कॅलिस लँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे.
 
भरली एवढी स्टॅम्प ड्युटी
माधुरीने या नव्या फ्लॅटच्या खरेदीपोटी २ कोटी ८० लाख रुपये एवढी स्टॅम्प ड्युटी भरली आहे. माधुरीने हा फ्लॅट ९० हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने खरेदी केला आहे. हा फ्लॅट अतिशय आलिशान आहे. त्यात मोठा हॉल, किचन, बेडरुम्स, डायनिंग हॉल, गॅलरी, टेरेस अशा विविध सुविधा आहेत. माधुरीचे नेने कुटुंबिय सध्या याच बिल्डींगमध्ये राहते.
 
वरळीत भाड्याची मालमत्ता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीने वरळीतील इंडियाबुल्स ब्लू बिल्डिंगमध्ये एक प्रॉपर्टी लीजवर घेतली आहे. ही मालमत्ता २९ व्या मजल्यावर आहे. यासाठी माधुरीने ३ कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यात दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ होते. ही मालमत्ता ५५०० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माधुरी दीक्षितने मुंबईत तीन वर्षांसाठी घर भाड्याने घेतले होते. भाड्याच्या घरासाठी माधुरी दरमहा १२.५ लाख रुपये भाडे देत होती.
 
‘धक धक गर्ल’ म्हटल्या जाणार्‍या माधुरी दीक्षितने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि आवडण्याजोग्या शैलीने सर्वांची मने जिंकली आहेत. वेब सीरिज ‘द फेम गेम’मध्ये माधुरी शेवटची दिसली होती. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यानंतर माधुरी लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘मजा मा’मध्ये दिसणार आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor