सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 12 जुलै 2022 (14:54 IST)

शाहरुखच्या बंगल्या शेजारी रणवीरने विकत घेतले 4 मजले

deepika ranveer
बॉलीवुड मधील कलाकारांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील नेहमीच चर्चा होते, रसिक चाहत्यांना या कलाकारांच्या गाड्या, बंगले मालमत्ता याविषयी नेहमीच उत्सुकता असते. आता देखील एका अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नव्या फ्लॅटविषयी अशी चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह व दीपिका लवकरच शाहरुख खानचा शेजारी होणार आहे.
 
रणवीर सिंह आणि त्याचे वडिलांनी वांद्र्यामध्ये एका इमरातीमध्ये चार मजले (क्वाड्राप्लेक्स घर) घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आहे. रणवीर सिंह याने घेतलेले नवीन घर शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याजवळ आहे. रणवीर सिंह याने तब्बल 119 कोटी रुपयांमध्ये वांद्र्यामध्ये चार मजले विकत घेतले आहेत. त्यामुळे आता शाहरुख आणि रणवीर शेजारी शेजारी झाले आहेत.
 
मुंबईतील वांद्रे परिसरात समुद्रकिनारी असलेला अत्यंत आलिशान असा उन्नत बंगला राजमहाला सारखा दिसतो. शाहरुख खान अनेक बंगल्यांचा मालक आहे. शाहरुखचा हा अतिशय आलिशान बंगला आहे. या व्हिलाची किंमत 100 कोटी रुपये आहे. आणि या व्हिलाचं नाव जन्नत आहे. सप्टेंबर 2007 मध्ये दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर नखील यांनी हा व्हिला शाहरुखला भेट म्हणून दिला होता.
 
तर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह आणि त्याचे वडिल जुगजीत भवनानी यांची ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क एलएलपी कंपनीने 119 कोटी रुपयांची रिअल इस्टेटमध्ये खरेदी केली आहे. रणवीर आता वांद्र्यामध्ये 19 कार पार्किंगसह क्वाड्राप्लेक्सचा (चार मजले) मालक झाला आहे. बँडस्टँडवर रणवीरने नवीन क्वाड्राप्लेक्स (चार मजले) खरेदी केले आहे. त्यामुळे रणवीर आता शाहरुख खानचा शेजारी झाला आहे.
 
तसेच दि. 8 जुलै 2022 रोजी रणवीरच्या ओह फाईव्ह ओह मिडिया वर्क्स एलएलपी कंपनीने वांद्रा येथील सागर रेशम इमारतीमध्ये 16, 17, 18 आणि 19 असे चार मजले विकत घेतले आहेत. ही खरेदी तब्बल 118.94 कोटी रुपयांची झाली आहे. रणवीर सिंह याने तब्बल 7.13 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.