बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (07:17 IST)

वाचा, माहिरा खान शाहरुख बद्दल काय बोलते ?

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावेळी माहिरा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानमुळे चर्चेत आहे. शाहरुखचे एका शब्दात वर्णन कसे करशील? असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला होता.  
 
माहिरा ट्विटरवरुन चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी एका चाहत्याने शाहरुखबाबत तिला प्रश्न विचारला. शाहरुखचे एका शब्दात वर्णन कसे करशील? यावर माहिराने गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिने शाहरुखचा एक फोटो पोस्ट करुन त्यावर ‘मॅजिक’ असे लिहिले आहे.
 
शाहरुखचे चाहते पाकिस्तानमध्ये देखील आहेत. माहिरा खान स्वत: शाहरुखची खुप मोठी चाहती आहे.  माहिराने ‘रईस’ या चित्रपटात शाहरुखसोबत काम केले होते. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये सुपरहिट ठरला होता. या पार्श्वभूमीवर माहिराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.