मंगळवार, 12 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 मार्च 2020 (15:12 IST)

कदाचित बीसीसीआयला माझी कामगिरी आवडली नाही

नुकत्याच रद्द झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांना कॉमेंट्री पॅनलमधून बीसीसीआयने वगळले होते. मांजरेकर खूप वर्षांपासून बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलचा हिस्सा होते. त्यांना वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी आपले मत मांडले आहे. कदाचित बीसीसीआयला माझी कामगिरी आवडली नाही. मात्र या निर्णयाचा एक व्यवसायिक रूपात मी स्वीकार करतो असेही ते म्हणाले. 
 
त्यांनी ट्विटरद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात मी कॉमेंट्रीला नेहमीच माझे सौभाग्य मानले आहे. मात्र त्यास कधी अधिकार मानलो नाही. हे सर्व त्यांच्यावरच आहे जे माझी निवड करतात अथवा नाही. मी नेहमीच या गोष्टीचा आदर करत आलो आहे. भारतासाठी मांजरेकर यांनी 37 कसोटी आणि 74 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते धर्मशाला येथील एकदिवसीय सामन्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हते तर सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिकसह बीसीसीआयचे कॉमेंट्री पॅनलचे अन्य सदस्य तिथे उपस्थित होते.