मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (16:24 IST)

चामखीळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय

आपल्या शरीरावर आपल्याला काही वेळा चामखीळ येतात. हे नको असलेले चामखीळ शरीरातील त्वचेची छिद्र प्रसरण पात नसून जवळ येतात. त्या वेळी त्वचेस शुद्ध वायू मिळत नसल्याने चामखीळ बनतात. त्या व्यतिरिक्त पापिलोमा विषाणूंमुळे पण चामखीळ होतात. 
 
कधी कधी हे तीळ आणि चामखीळ आनुवंशिक असतात तर कधी शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्स मुळे पण आढळतात. हे तीळ किंवा चामखीळ आपल्या सौंदर्यात बाधक असतात. शरीरांवर जास्त प्रमाणात तीळ किंवा चामखीळ असल्यास त्वचा तज्ज्ञांकडून त्वरित परामर्श घ्यावे. हे एखाद्या आजाराचे संकेतही असू शकतात. काही वेळा चिकित्सक सर्जरी करण्याचे परामर्श देतात. पण ह्या चामखिळींना आपण काही घरगुती उपाय करून पण नाहीसे करू शकता. आपण आपल्या स्वयंपाकातील दैनंदिन उपयोगात येणाऱ्या साहित्यांचा वापर करून चामखिळीचा नायनाट करू शकता. चला तर मग बघू या काय आहे हे साहित्य: 
 
1  लसूण : लसूण हे फक्त खाण्यासाठी नव्हे तर सौंदर्यवर्धक देखील आहे. लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून दररोज रात्री तीळ किंवा चामखिळी वर लावून त्यांवर सुटी कापड झाकून ठेवावे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून धुऊन घ्यावे. आठवड्यातून 3 -4 वेळा केल्याने चामखिळीचा नायनाट होईल. 
 
2  कांद्याचा रस : कांद्याचा रस आपल्याला माहीतच आहे की केसांच्या वाढीस साठी तसेच केसांची उत्तम निगा राखण्यासाठी वापरले जाते. याच बरोबर शरीरावरील तीळ किंवा चामखीळसाठी कांद्याच्या रसाचा उपयोग करता येते. कांद्याच्या रसाला चामखिळींवर तास भर लावून ठेवणे नंतर स्वच्छ थंड पाण्याने धुवावे. दररोज दिवसांतून हे 2 -4 वेळा करावे.    
 
3 कोरफड : त्वचेला सतेज ठेवणे, सुंदर ठेवणे तसेच अनेक आजारांवर कोरफड रामबाण औषध आहे. ह्या व्यतिरिक्त शरीरावरील तीळ आणि चामखिळीचा नायनाट पण कोरफड करते. ताज्या कोरफडीच्या जेल तीळ किंवा चामखीळ असलेल्या भागांवर लावावे आणि पट्टीने बांधून ठेवावे. नंतर तास भराने पुसून किंवा धुऊन घ्यावे. दररोज दिवसांतून किमान 3 -4 वेळा हे करावे. तीळ आणि चामखिळीचा नायनाट होतो.
 
4 केळं : केळं खाण्यासाठी, केसांची चमक वाढविण्याचा व्यतिरिक्त त्वचा चमकदार सतेज बनविण्यासाठी तसेच चामखिळीचा नायनाट करण्यासाठी वापरण्यात येतं. केळं बारीक करून त्याला चामखिळी वर लावावे. दररोज हे केल्यास चामखीळ नाहीसे होतात.
 
5  एरंडेल तेल : एरंडेल तेल पोटासाठीच औषधीतर आहेच, त्वचेस निरोगी ठेवण्याच्या कामाव्यतिरिक्त तीळ आणि चामखीळ वर 2 चमचे खायच्या सोड्यात (बेकिंग सोडा) मध्ये 3 -4 थेंब टाकून पेस्ट तयार करून चामखिळींवर कापसाने लावावी आणि रात्रभर कापड्याने झाकून ठेवावे.सकाळी अंघोळीच्या वेळेस धुऊन घ्यावे. चामखिळीचा नायनाट होतोच तीळ आणि चामखिळीचें डाग पण नाहीसे होतात.
     
6  अननसाचा रस : अननसात अॅसिड असते जे शरीरावरील तीळ, चामखीळ काढण्यास उपयुक्त असते. अननसाचा गर किंवा रस ह्यांचा वर कापसाच्या साहाय्याने लावावा. काही काळ तसेच ठेवून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.   
 
7  फ्लॉवर (फुल कोबी) चे तुकडे : फ्लॉवर मधील व्हिटॅमिन 'सी' शरीरावरील तीळ आणि चामखिळ्यांचा नायनाट करण्यास उपयुक्त असते. फ्लॉवरचे रस काढून ते रस त्या जागेवर लावून ठेवावे. अर्ध्या किंवा एका तासाने पाण्याने धुऊन घ्यावे आणि पुसून घ्यावे. चामखीळ आणि तीळ नाहीसे होतील.
 
8 स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी तर सगळ्यांना आवडतेच. मुलं तर आवडीने खातात मग ते फळ असो किंवा आइसक्रीमच्या रूपात सगळ्यांनाच ही आवडते. ह्यात असलेले पोषक तत्त्व चामखीळ आणि तिळांचा नायनाट करण्यास सक्षम असतात. या साठी स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून त्या जागेस लावून चोळावे. नियमित हे केल्यास चामखीळ जाते.
 
9 बटाटा : बटाट्याने शरीरातील काळे डाग जातात. तसेच चामखीळ आणि तीळ काढण्यास हे उपयोगी असते. यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म आढळतात. बटाट्याचे काप करून चामखील असलेल्या ठिकाणी चोळवून बँडेज लावून ठेवावे. 7 -8 दिवस असे दररोज करावे. चामखीळ आणि तीळ असल्यास आपोआप बॅंडेज बरोबर निघून जाते.
 
10 लिंबाचा रस : लिंबाचा वापर सौंदर्यासाठी केला जातो. व्हिटॅमिन सी असल्याने हे त्वचेस फायदेकारक असते. लिंबाच्या रसाला कापसाने चामखळीवर लावावे आणि टेप लावून ठेवावे. मिनिटानंतर हे काढून घ्यावे. दररोज दिवसांतून किमान 2 -3 वेळा हे केल्यास चांगला परिणाम मिळतो. 
 
11 मध : हे नैसर्गिक असल्याने याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मध चामखिळींवर 1 तास लावून बँडेज लावून ठेवणे नंतर बॅंडेज काढून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावे. नियमित हे केल्यास चांगले परिणाम हाती लागतात.
 
12 हळद : हळद ही बऱ्याच गोष्टींसाठी घरगुती उपचार म्हणून वापरली जाते. व्हिटॅमिन सी ची गोळी, मध आणि हळद याची पेस्ट बनवून तीळ आणि चामखिळींवर लावावे. 20 मिनिटानंतर वाळल्यावर पाण्याने धुऊन पुसून घ्यावे. चामखिळीसाठी हे प्रभावी आहे.
 
13 कोथिंबीर : कोथिंबीर खाण्याच्या व्यतिरिक्त तीळ आणि चामखिळीचा नायनाट करण्यासाठी उपयोगी असते. कोथिंबिरीची पेस्ट बनवून 15 मिनिटे लावून ठेवावी. नंतर धुऊन घ्यावे.
 
14 नारळाचं तेल : नारळाचे तेल चामखिळी वर लाभकारी असते. दररोज रात्री चामखिळी आणि तीळ वर तेल लावून ठेवल्याने चांगला परिणाम होतो.
 
15 बेकिंग सोडा : चामखीळ आणि तीळ याला बेकिंग सोडा कोरडे करून पाडून टाकते. 1 चमचा बेकिंग सोड्यात 3 -4 थेंब एरंडेल तेल घालून चामखिळींवर लावावे. रात्रभर बँडेज लावून ठेवावे. दररोज केल्यास त्वरित परिणाम होतो.